श्री स्वामींच्या चरणी मन रमवा
स्वामी जगाची माऊली
स्वामी जगाची माऊली
स्वामी कृपेची सावली
ऐसी निरंतर माया
आम्ही कुठे ना पाहिली
आनंदाचे दान देई
संकटात धाव घेई
सारी सुमने श्वासांची
स्वामी चरणी वाहिली
तारणहार सगुण साकार,
सदा हाकेसी धावुन येई
अपरंपार असा आधार,
भयाच्या पार मनाला नेई
ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही,
म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ जय जय स्वामी समर्थ ॥