पवित्र स्तोत्र पठण करा

Shant Ho Shriguru Datta/ Karunapadi
॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ॥
|| शांत हो श्रीगुरुदत्ता ||
शांत हो श्रीगुरुदत्ता,
मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता,
सर्वथा तूं हितकर्ता ।
तूं आप्तस्वजन भ्राता,
सर्वथा तूंचि त्राता ।
भयकर्ता तूं भयहर्ता,
दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता ।
तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा,
जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्हीं गाउनि गाथा,
तव चरणीं नमवूं माथा ।
तूं तथापि दंडिसि देवा,
कोणाचा मग करुं धावा ।
सोडविता दुसरा तेव्हां ।
कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी,
दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि,
आम्हांवरि न च संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि,
असें मानुनी नच होऊ कोपी ।
निजकृपा लेशा ओपी ।
आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता,
आडमार्गीं पाउल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता,
आणिता न दुजा त्राता ।
निज बिरुदा आणुनि चित्ता,
तूं पतितपावन दत्ता ।
वळे आतां आम्हांवरता ।
करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार,
दास आम्ही हें घरदार ।
तव पदी अर्पूं असार ।
संसाराहित हा भार ।
परिहरिसी करुणासिंधो,
तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघलेश न बाधो ।
वासुदेव प्रार्थित दत्ता ॥५॥
|| श्रीगुरुदत्ता जय भगवंता ||
श्रीगुरुदत्ता जय भगवंता,
तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥
चोरें द्विजासी मारितां मन जें,
कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥
पोटशुळानें द्विज तडफडतां,
कळवळले ते कळवळो आता ॥२॥
द्विजसुत मरतां वळलें तें मन,
हो की उदासीन न वळे आतां ॥३॥
सतिपति मरता काकुळती येतां,
वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥
श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता कोमल चित्ता,
वळवी आता ॥५॥
|| जय करुणाघन ||
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु.॥
निजअपराधें उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर ।
रुससी न किंकरवरद कृपाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥३॥
बालकापराधा गणे जरि माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥
Dattaguru Sharanaastak
दत्तात्रेया तव शरणम् ।
दत्तनाथा तव शरणम् ॥
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता ।
त्रिभुवनपालक तव शरणम् ॥१॥
शाश्वतमूर्ते तव शरणम् ।
श्यामसुंदरा तव शरणम् ॥
शेषाभरणा शेषभूषणा ।
शेषशायि गुरु तव शरणम् ॥२॥
षड्भुजमूर्ते तव शरणम् ।
षड्भुजयतिवर तव शरणम् ॥
दंडकमंडलु गदापद्मकर ।
शंखचक्रधर तवं शरणम् ॥३॥
करुणानिधे तव शरणम् ।
करुणासागर तव शरणम् ॥
श्रीपादश्रीवल्लभ गुरुवर ।
नृसिंहसरस्वति तव शरणम् ॥४॥
श्रीगुरुनाथा तव शरणम् ।
सद्गुरुनाथा तव शरणम् ॥
कृष्णासंगमतरुवरवासी ।
भक्तावत्सला तव शरणम् ॥५॥
कृपामूर्तें तव शरणम् ।
कृपासागरा तव शरणम् ॥
कृपाकटाक्षा कृपावलोकना ।
कृपानिधे प्रभु तव शरणम् ॥६॥
कालांतका तव शरणम् ।
कालनाशका तव शरणम् ॥
पूर्णानंदा पूर्णपरेशा ।
पुराणपुरुषा तव शरणम् ॥७॥
जगदीशा तव शरणम् ।
जगन्नाथा तव शरणम् ॥
जगत्पालका जगदाधीशा ।
जगदुद्धारा तव शरणम् ॥८॥
अखिलांतरा तव शरणम् ।
अखिलैश्वर्या तव शरणम् ॥
भक्तप्रिया वज्रपंजरा ।
प्रसन्नवक्त्रा तव शरणम् ॥९॥
दिगंबरा तव शरणम् ।
दीनदयाघन तव शरणम् ॥
दीनानाथा दीनदयाळा ।
दीनोद्धारा तव शरणम् ॥१०॥
तपोमूर्ते तव शरणम् ।
तेजोराशी तव शरणम् ॥
ब्रह्मानंदा ब्रह्मसनातन ।
ब्रह्ममोहना तव शरणम् ॥११॥
विश्वात्मका तव शरणम् ।
विश्वरक्षका तव शरणम् ॥
विश्वंभरा विश्वजीवना ।
विश्वपरात्पर तव शरणम् ॥१२॥
विघ्नांतका तव शरणम् ।
विघ्ननाशका तव शरणम् ॥
प्रणवातीत प्रेमवर्धना ।
प्रकाशमूर्ते तव शरणम् ॥१३॥
निजानंदा तव शरणम् ।
निजपददायका तव शरणम् ॥
नित्यनिरंजन निराकारा ।
निराधारा तव शरणम् ॥१४॥
चिद्घनमूर्ते तव शरणम् ।
चिदाकारा तव शरणम् ॥
चिदात्मरूपा चिदानंदा ।
चित्सुखकंदा तव शरणम् ॥१५॥
अनादिमूर्ते तव शरणम् ।
अखिलावतारा तव शरणम् ॥
अनंतकोटिब्रह्मांडनायका ।
अघटितघटना तव शरणम् ॥१६॥
भक्तोद्धारा तव शरणम् ।
भक्तरक्षका तव शरणम् ॥
भक्तानुग्रहभक्तिप्रिया ।
पतितोद्धारा तव शरणम् ॥१७॥
Kalbhairav Astak
ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ १ ॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ २ ॥
शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ३ ॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ४ ॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५ ॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ६ ॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ७ ॥
भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ८ ॥
कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥
॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं ||
कालभैरवाष्टकं संपूर्णम् ॥
Swami Samarth Manaspuja
श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय
स्वामी समर्थाय नमो नमस्ते
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळ
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा
समर्था तुम्हा विण हो जीव तैसा
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी
हृदयासनी या बसा प्रार्थितो मी
पूजेचे यथासांग साहित्य केले
मखरांत स्वामी गुरू बैसविले
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती
जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ
परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती
ओवाळोनी अक्षता लावू मोती
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला
चरणा वरी ठेवूया मस्तकाला
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा
तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा
तुम्ही वाहिला भार या जीवनाचा
नमो स्वामी राजम दत्तावतारम
श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय
स्वामी समर्थाय नमो नमस्ते
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळ
मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा
समर्था तुम्हा विण हो जीव तैसा
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी
हृदयासनी या बसा प्रार्थितो मी
पूजेचे यथासांग साहित्य केले
मखरांत स्वामी गुरू बैसविले
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती
जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ
परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती
ओवाळोनी अक्षता लावू मोती
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला
चरणा वरी ठेवूया मस्तकाला
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा
तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा
तुम्ही वाहिला भार या जीवनाचा
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा
शिव शंकराची असें शक्तिपूजा
दहीदुध शुद्धोदकाने तयाला
पंचामृती स्नान घालू प्रभूला
वीणा तुतार्या किती वाजताती
शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त
श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली
श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया
महिमा तयांचा कळेना जगा या
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता
घडू दे पूजा ही यथासांग आता
अजानबाहू भव्य कांती सतेज
नसे मानवी देह हा स्वामीराज
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज
तया घालुया रेशिमी वस्त्र साज
सुगंधित भाळी टीळा रेखियेला
शिरी हा जरीटोप शोभे तयाला
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा
सुवास तो वाढवी भाव साचा
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते
गुलाब जाई जुई अत्तराते
गंधाक्षता वाहूनीया पदाला
ही अर्पूया जीवन पुष्प माला
चरणी करांनी मिठी मारू देई
म्हणे लेकरासी सांभाळ आई
इथें लावुया केशर कस्तुरीचा
सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली
गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली
करूणावतारी अवधूत कीर्ति
दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची
अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची
हृदमंदिरीची ही स्नेह ज्योती
मला दाखवी स्वामिची योगमुर्ति
करू आरती आर्त भावे प्रभूची
गुरूदेव श्री स्वामी दत्तात्रयाची
पंचारती ही असे पंचप्राण
ओवाळूनी ठेवू चरणा वरून
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही
मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं
हे स्वामीराजा बसा भोजनाला
हा पंचपक्वान्न नैवेद्य केला
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची
लाडू करंजी असें ही खव्याची
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा
हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा
पुढें हात केला या लेकरानें
प्रसाद द्यावा आपुल्या करानें
तांबुल घ्यावा स्वामी समर्था
चरणाची सेवा करू द्यावी आता
प्रसन्नतेतून मागू मी काय
हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू
दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ
नको दूर लोटू आपुल्या मुलासी
कृपा छत्र तुमचेच या बालकासी
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला
पदी ठेवू दे शीर शरणा गताला
हृदयी भाव यावें असे तळमळीचे
करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा
नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा
मनी पूजनाची असे दिव्य ठेव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव
वसो माझीया अन्तरी स्वामी देव