श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्या
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः
Swami Samarth Tarak Mantra
निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Swami Samarth Astak
असें पातकी दीन मीं स्वामी राया ।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ॥
नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ १ ॥
मला माय न बाप न आप्त बंधू ।
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ॥
तुझा मात्र आधार या लेकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ २ ॥
नसे शास्त्र विद्या कलादीक काही ।
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ॥
तुझे लेकरु ही अहंता मनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ३ ॥
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा ।
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ॥
क्षमेची असे याचना त्वत्पदाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ४ ॥
मला काम क्रोधाधिकी जागविले ।
म्हणोनी समर्था तुला जागविले ॥
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ५ ॥
नको अंत पाहू त्वरे धाव घेई ।
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ॥
अनाथासि आधार तुझा दयाळा ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ६ ॥
कधी गोड वाणी न येई मुखाला ।
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ॥
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ७ ॥
मला एवढी घाल भीक्षा समर्था ।
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ॥
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ॥ ८ ॥
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
Sadagurunatha Hat Jodito
सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु ।
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ॥ धृ० ॥
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु ॥ १ ॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू ।
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ॥ २ ॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू ।
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥ ३ ॥
अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू ।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ॥ ४ ॥
Let’s Create Your Perfect Garden
Let’s Bring Your Landscape Vision to Life
Ready to Transform Your Outdoor Space?
Inspired to Create Your Own Garden?
Easy-Care Indoor Plants for a Beautiful Home